आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA 2018: मौनी रॉय-नुसरत भरूचाने दिला धमाकेदार परफॉर्मन्स, या सिंगर्सना मिळाला अवॉर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉकः 19वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) सोहळ्याला शुक्रवार रात्री बँकॉकमध्ये सुरुवात झाली. या सोहळ्याच्या रॉक नाइटमध्ये यावर्षी  'सोनू के टीटू की स्वीटी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचाने जबरजस्त परफॉर्मन्स दिला. तर 'गोल्ड' या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालेली अभिनेत्री मौनी रॉय हिचादेखील धमाकेदार परफॉर्मन्स झाला. याशिवाय अमित मिश्रा, शाल्मली खोलगडे, अंतरा मित्रा, प्रीतम चक्रवर्ती यांचे सादरीकरण यावेळी झाले. 

 

पहिल्या दिवशी 'जब हॅरी मेट सेजल' साठी अरिजित सिंह आणि 'सीक्रेट सुपरस्टार'साठी  मेघना मिश्राला बेस्ट प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला. अवॉर्ड्स नाइटच्या ग्रीन कार्पेटवर अनेक बॉलिवूड सेलेब्स स्टायलिश आणि गॉर्जिअस लूकमध्ये अवतरले. ग्रीन कार्पेटवर अभिनेत्री उर्वशी रौतेला गोल्डन कलरच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसली. तर दिग्दर्शक रमेश सिप्पी पत्नी किरण जुनैजासोबत अवॉर्ड नाइटमध्ये पोहोचले. आयफा सोहळा 24 जूनपर्यंत रंगणार आहे. 


नव-यासोबत दिसली दिया मिर्झा...
ग्रीन कार्पेटवर दिया मिर्झा तिचे पती साहिल संघासोबत पोहोचली. यावेळी दियाने ग्रीन कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. याशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, यूलिया वंतूर, कृति सेनन, कोंकणा सेन शर्मा, डायना पेंटी, वरुण धवन, करण जोहर, अर्जुन कपूर, रितेश देशमुख, पती भूषण कुमारसोबत दिव्या कुमार खोसला ग्रीन कार्पेटवर दिसले. 


20 वर्षांनंतर स्टेजवर परफॉर्म करणार रेखा... 
 रेखा यंदाच्या IIFA अवॉर्ड्सच्या स्टेजवर परफॉर्मन्स देणार आहे. त्यांनी 20 वर्षांपुर्वी 31 जानेवारी 1998 मधील 43 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये शेवटचा स्टेज परफॉर्मन्स दिला होता. त्यावेळी त्यांनी 'ये क्या शहर है दोस्तों', 'इन आंखों की मस्ती', 'सलाम-ए-इश्क' आणि 'दिल चीज क्या है' सारख्या गाण्यांवर डान्स केला होता.

 

पहिल्या दिवशी यांना मिळाले पुरस्कार

 

कॅटेगिरी

नाव
1. बॅकग्राउंड स्कोर जग्गा जासूस (प्रीतम चक्रवर्ती)
2. बेस्ट कोरियोग्राफी जग्गा जासूस (विजय गांगुली आणिरुएल दौसन वरिंदानी)
3. स्पेशल इफेक्ट जग्गा जासूस (एनवाय वीएफएक्स वाला)
4. बेस्ट स्क्रीनप्ले नितेश तिवारी आणि श्रेयस जैन (बरेली की बर्फी)
5. बेस्ट डायलॉग हितेश केवल्य (शुभ मंगल सावधान)

 

दुस-यांदा बँकॉकमध्ये होतोय हा सोहळा...

 हा अवॉर्ड शो दूस-यांदा बँकॉकमध्ये होत आहे. यापुर्वी 2008 चा आयफा अवॉर्ड्स बँकॉकमध्ये झाला होता. त्यावर्षी शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया'ला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला होता. वृत्तांनुसार यावेळी अनुपम खेर यांना 'स्पेशल अवॉर्ड' दिला जाईल. तर आयफा अवॉर्ड 24 जून 2000 मध्ये लंडनमध्ये आयोजिक करण्यात आला होता. यामध्ये 'हम दिल दे चुके सनम'ला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला होता.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड नाइटची खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...