आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Janhvi Kapoor And Ishaan Khatter Attend Shahid Kapoor Wife Mira Rajput Baby Shower

Inside Pics : मीरा राजपूतच्या Baby Shower मध्ये या अंदाजात दिसले जान्हवी-ईशान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच दुस-या बाळाचे आईबाबा होणार आहेत. याचवर्षी एप्रिल महिन्यात शाहिदने त्यांना दुस-या बाळाच्या आगमनाची चाहुल लागल्याची बातमी चाहत्यांना दिसली होती. रविवारी मीराचे बेबी शॉवर पार पडले. या कार्यक्रमाला सध्या 'धडक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेला मीराचा धाकटा दीर ईशान खट्टर उपस्थित होता. विशेष म्हणजे तो एकटा नव्हे तर त्याची को-स्टार आणि श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूरसुद्धा मीराच्या बेबी शॉवरला पोहोचली होती. बेबी शॉवरमधील ईशान आणि जान्हवीचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत मीरा बेबी बंपसोबत पोज देताना दिसतेय. तर तिच्या मागे जान्हवी आणि ईशान एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. 


बेबी शॉवरला मीराने Zimmermann ब्रॅण्डचा पोलका डॉट्स गाऊन परिधान केला होता. तर शाहिद कपूर  प्रिंटेड फ्लोरल शर्टमध्ये दिसला. शाहिद आणि मीरा यांचे 2015 मध्ये लग्न झाले. तर ऑगस्ट 2016 मध्ये त्यांची लेक मीशा हिचा जन्म झाला. अलीकडेच शाहिद 'पद्मावत' या चित्रपटात झळकला होता. तर सध्या तो 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  


पुढील स्लाईड्सवर बघा, मीरा राजपूतच्या बेबी शॉवरचे Inside Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...