आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karan Johar Twins Roohi And Yash And Kareena Son Taimur Ali Khan Are New Friends In Town

करण जोहरने शेअर केले 10 महिन्यांच्या रुही-यशचे Photo, म्हणाला- तैमूर आहे बेस्ट फ्रेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सरोगसीने दोन मुलांचा पिता झालेल्या करण जोहरने मुलगा यश आणि मुलगी रुहीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये करीना कपूरचा मुलगा तैमूर देखील आहे. फोटोमध्ये तिन्ही मुलं खेळताना दिसतात. सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करताना लिहिले आहे, की नव्या मैत्रीची सुरुवात. येणाऱ्या काळात तैमूर, यश-रुही इंडस्ट्रीतील नवे बेस्ट फ्रेंड्स असतील. यश-रुही जुळी भावंडं असून ते 10 महिन्यांचे आहेत, तर तैमूर येत्या 20 डिसेंबरला 1 वर्षांचा होईल. 

 

आदिराच्या बर्थडे पार्टीला आले होते तैमूर-यश आणि रुही... 
- राणी मुखर्जी आणि आदित्या चोप्रा यांची मुलगी आदिराचा नुकताच दुसरा बर्थडे सेलिब्रेट झाला. या बर्थडे पार्टीला तैमूर, यश आणि रुही आदिराला बर्थडे विश करण्यासाठी आले होते. 
- यश आणि रुही त्यांचे पापा करण जोहरसोबत तर तैमूर त्याची आई करीना आणि मावशी करिश्मा कपूरसोबत पार्टीत आला होता.
- यासोबतच तुषार कपूर त्याचा मुलगा लक्ष्य, शाहरुख खान मुलगा अबरामसह आला होता. दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, सोनम कपूर आणि तिची बहीण रिया देखील पार्टीला आली होती. 
- काही महिन्यांपूर्वीच राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचे निधन झाले होते, त्यामुळे राणी - आदित्य चोप्राने मुलीसाठी छोटेसे सेलिब्रेशन अॅरेंज केले होते. 

 

सरोगसीने पापा झाला करण 
- करण जोहर 44 वर्षांचा असून 2017 मध्ये सोरगसीद्वारे तो जुळ्या मुलांचा सिंगल फादर झाला आहे. 
- करणला एकट्यालाही पिता होता येईल याचा सल्ला कोरियोग्राफर फराह खानने दिला होता. 
- 7 फेब्रुवारी 2017 ला यश आणि रुहीचा जन्म अंधेरीतील मसरानी हॉस्पिटलमध्ये झाला. 
- बर्थ रजिस्टेशन करताना पित्याच्या कॉलममध्ये करण जोहरचे नाव आहे, तर आईचा कॉलम रिकामा होता. 
- करणने मुलगा आणि मुलीला स्वतःच्या आई-वडिलांचे नाव रुही आणि यश दिले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्येमध्ये पाहा, करण जोहरच्या मुला-मुलीचे आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...