आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Sister Arpita Khan Christmas Party: Kareena Kapoor Sister In Law Katrina Kaif And Iulia Vantur Attend

​कतरिनाला सोडून युलियासोबत बहिणीच्या पार्टीत पोहोचला सलमान, हे सेलेब्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युलिया वंतूसोबत सलमान खान, कतरिना कैफ,  यश आणि रुहीसोबत करण जोहर - Divya Marathi
युलिया वंतूसोबत सलमान खान, कतरिना कैफ, यश आणि रुहीसोबत करण जोहर


मुंबईः अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिने सोमवारी रात्री मुंबईतील तिच्या राहत्या घरी ख्रिसमस बॅशचे आयोजन केले होते. या पार्टीत करीना कपूर खान हिची नणंद सोहा अली खान तिच्या तीन महिन्यांची मुलगी इनाया आणि पती कुणाल खेमूसोबत पोहोचली होती. सोहाने या पार्टीसाठी वन साइडेड शोल्डर ड्रेसची निवड केली होती. तर चिमुकली इनाया व्हाइट आणि रेड कलर कॉम्बिनेशन असलेल्या ड्रेसमध्ये दिसली. 


कतरिनासोबत नव्हे युलियासोबत पोहोचला सलमान...
- पार्टीत अर्पिताने कतरिना कैफ आणि युलिया वंतूर यांनादेखील आमंत्रित केले होते.
- सलमान युलियासोबत अर्पिताच्या घरी पोहोचला. दोघेही एकत्र आत जाताना दिसले.
- तर कतरिना एकटीच अर्पिताच्या घरी पोहोचली. यावेळी कतरिनाने ब्लू कलरचा ड्रेस परिधान केला होता.


जुळ्या मुलांसोबत पोहोचला करण... 
- पार्टीत करण जोहर त्याच्या जुळ्या मुलांसोबत दिसला. चिमुकले यश आणि रुही यावेळी अतिशय क्यूट दिसले. 


हे सेलेब्सही झाले पार्टीत सहभागी... 
- पार्टीत मुलगा लक्ष्यसोबत तुषार कपूर, मलायका अरोरा, पती शकील लडकसोबत अमृता अरोरा, मुलांसोबत मिनी माथूर, अलविरा अग्निहोत्री हे सेलेब्सही अर्पिताच्या घरी पोहोचले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, अर्पिता खान शर्मा हिच्या घरी झालेल्या ख्रिसमस पार्टीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...