आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Biopic Manisha Koirala Spotted With BF On Ranbir Kapoor Starrer Sanju Movie Screening

Sanju Screening: आपल्या पहिल्या हीरोसोबत पोहोचली मनीषा, रणबीर आणि आलियाची आईसुद्धा दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या 'संजू' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग बुधवारी मुंबईतील यशराज स्टुडिओत झाले. या स्क्रिनिंगला संजय दत्त पत्नी मान्यतासोबत पोहोचला होता. यासोबतच रणबीर आणि अनेक मोठे स्टार्स स्क्रिनिंगला हजर होते. स्क्रिनिंगला मनीषा कोइराला तिचा फिल्म इंडस्ट्रीतील पहिला हीरो  विवेक मुश्रान (फिल्म सौदागर) सोबत एकाच कारमधून स्क्रिनिंग स्थळी पोहोचली. रणबीरची आई नीतू कपूर आणि आलियाची आई सोनी राजदान यांनीही स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलिया यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही म्हटले जात आहे. 


हे सेलेब्स पोहोचले स्क्रिनिंगला... 
स्क्रिनिंला चित्रपटातील स्टारकास्ट व्यतिरिक्त दिव्या खोसला कुमार, भूषण कुमार, डेविड धवन, संजय खान, बंटी वालिया, प्रिया दत्त, नम्रता दत्त, कृष्णा राज कपूर, राजू हिराणी, विधु विनोद चोप्रासह अनेक सेलेब्स पोहोचले होते. हा चित्रपट उद्या म्हणजेच 29 जून रोजी रिलीज होतोय. चित्रपटात रणबीरसह परेश रावल, मनीषा कोइराला, दीया मिर्झआ, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विक्की कौशल, जिम सर्भ आणि करिश्मा तन्ना या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


पुढील स्लाईड्सवर बघा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...