आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parineeti Chopra Irritated With Dress At Ambani Bash Siddharth Malhotra Help Her

​ Ambaniच्या पार्टीत परिणीतीचा ड्रेस नीट करताना दिसला सिद्धार्थ, शाहिदने सावरले पत्नीचे केस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बिजनेसमन मुकेश अंबानींचा थोरला मुलगा आकाश अंबानीचा अलीकडेच मुंबईत साखरपुडा झाला. अतिशय भव्यदिव्य असा हा सोहळा पार पडला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. कार्यक्रमाला अभिनेत्री परिणीती चोप्रा इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये पोहोचली होती. पण या ड्रेसने ती चांगलीच वैतागलेली यावेळी दिसली. पावलापावलावर परिणीती तिचा ड्रेस सावरताना दिसत होती. पार्टीती काही फोटोज समोर आले आहेत, यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा परिणीतीला तिचा ड्रेस सावरण्यात मदत करताना दिसतोय. सिद्धार्थ परिणीतीच्या ड्रेसची बॅक साइड पिनअप करताना यावेळी दिसला. परिणीती ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस आणि हाय हिल्समध्ये खरं तर सुंदर दिसली. पण या ड्रेसमुळे तिची चांगलीच पंचाईत झाली होती, हेही तितकेच खरे आहे. परिणीती अर्जुन कपूरसोबत  'पिंकी और बंटी फरार' आणि 'नमस्ते इग्लैंड'मध्ये झळकणार आहे. याच पार्टीत अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत पोहोचला होता. या दोघांचा यावेळी एक क्यूट मोमेंट कॅमे-यात कैद झाला. दोघेही जसे अंबानींच्या घरी पोहोचले, कॅमे-याच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. फोटोसेशनवेळी शाहिद पत्नी मीराचे केस सावरताना दिसला.  

 

बातम्या आणखी आहेत...