आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफेअरच्या चर्चा सुरु असताना विदेशी BFसोबत डिनर डेटवर पोहोचली प्रियांका, आई होती सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा तथाकथित बॉयफ्रेंड अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत शुक्रवारी डिनर डेटवर दिसली. वांद्रा येथील एका रेस्तराँमध्ये हे दोघे पोहोचले होते. येथून प्रियांका निकचा हात हातात पकडून बाहेर पडत असताना कॅमे-याच्या नजरा दोघांकडे वळल्या. गर्दीतून वाट काढत बॉडीगार्ड्सच्या मदतीने दोघे कारपर्यंत पोहोचले. शुक्रवारी सकाळीच प्रियांका जोनाससोबत मुंबईत पोहोचली. एअरपोर्टवरुन दोघे एकाच गाडीतून रवाना झाले. यावेळी प्रियांका निकला कॅमे-याच्या नजरांपासून वाचत तेथून घेऊन गेली होती. या डिनर डेटच्या काही तासांनी निकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रियांकाचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रियांका बालकनीत उभी दिसतेय. तिच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.

खास गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करुन निकने हार्ट शेपच्या इमोजीसोबत लिहिले 'Her..'

 

आई मधु यांना नकोय विदेशी जावई... 

निक सध्या 25 वर्षांचा आहे तर प्रियांकाने पस्तिशी ओलांडलीय. अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत लोकप्रिय डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. येथील एक व्हिडीओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीतही दिसले. त्यांचा तेथील वावर बरेच काही सांगणारा होता. पण प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना विचाराल तर त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते. ”मी कुण्या विदेशीसोबत प्रियांकाच्या लग्नाची कल्पनाही करू शकत नाही. या सगळ्या अफवा आहेत. मीडिया काहीही लिहितो,”असे त्यांनी म्हटले होते.


पण शुक्रवारी रात्री जेव्हा  निक आणि प्रियांका डिनर डेटवर गेले होते, त्यावेळी मधु चोप्रासुद्धा त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे आता त्यांचा या दोघांच्या नात्यावर आक्षेप नसावा, असा अर्थ लावला जातोय. 

 

कोण आहे नीक जोनास... 
प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. निक हा अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. 8-9 वर्षांचा होता तेव्हापासून निक अभिनय करतोय. यादरम्यान अनेक नाटकांत त्याने अभिनय केला.2002 मध्ये निकने वडिलांसोबत मिळूल  जॉय टू द वर्ल्ड नावाचे एक गाणे लिहिले आणि अशाप्रकारे निकने अभिनयाशिवाय संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले. निकचे वडीलही एक गीतकार, गायक आणि रंगभूमी कलाकार होते. आई साईन लँग्वेजची टीचर होती़ सोबतच गायिका होती. वारसा निकला घरातूनच मिळाला होता. 2005मध्ये निकने पॉल केविन जोनास आणि जोसेफ एडम जोनास या दोन भावांसोबत जोनास ब्रदर्स नावाचा पॉप रॉक बँड बनवला. जोनास ब्रदर्सने चार अल्बम रिलीज केले आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, डिनर डेटवर गेलेल्या निक-प्रियांकाची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...