आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF निकच्या हातात हात घालून आकाश अंबानीच्या प्री-एंगेज्मेंट पार्टीत पोहोचली प्रियांका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत गुरुवारी रात्री मुकेश अंबानींच्या थोरल्या मुलाच्या प्री एंगेज्मेंट पार्टीत पोहोचली. यावेळी पार्टीसाठी प्रियांकाने डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधील गोल्डन बॉर्डर असलेल्या रेड साडीची निवड केली होती. प्रियांकाने रेड लिपस्टिक, टिकली आणि डायमंड इयररिंग्स, आम्रपाली बँगल्सने आपला लूक पूर्ण केला. तर तिचा बॉयफ्रेंड निक ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसला. दोघेही हातात हात घालून पार्टीत दाखल झाले. प्रियांका निकला तिच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मुंबईत घेऊन आली होती. 

 

आकाश अंबानीची भावी पत्नी श्लोकाच्या मेंदी सेरेमनीतही पोहोचली होती प्रियांका.. 
बुधवारी आकाश अंबानीची भावी पत्नी श्लोकाची मेंदी सेरेमनी झाली. या कार्यक्रमातसुद्धा प्रियांका आणि निक एका कारमधून अंबानींच्या घरी पोहोचले होते. तर प्रियांकाची आई मधू चोप्रा दुस-या कारमधून आल्या होत्या.  कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर प्रियांकाने आईची गळाभेट घेऊन त्यांना रवाना केले. तर तीसुद्धा निकसोबत दुस-या कारमधून घरी रवाना झाली. प्रियांकाने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले, "आकाश आणि श्लोका तुमचे अभिनंदन. खूप सुंदर सेरेमनी होती. दोघांना खूप खूप प्रेम... प्री-प्री एंगेजमेंट पार्टी।"

 

महिन्याभरात प्रियांका करु शकते निकसोबत साखरपुडा...
- प्रियांका चोप्रा आणि निक जोनास जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत साखरपुडा करण्याची शक्यता आहे. मंगळवारी फिल्मफेअर मॅगझिनने हे वृत्त दिले होते. प्रियांकाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्मफेअर मॅगझिनने हे वृत्त दिसल्याचे समजते. 22 जून रोजी निक प्रियांकासोबत भारत भेटीवर आला आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, अंबानींच्या पार्टीत क्लिक झालेली प्रियांका-निकची निवडक छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...