आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ambaniच्या भावी सुनेच्या मेंदी सेरेमनीत बॉयफ्रेंडसोबत पोहोचली प्रियांका, कारमध्ये चेहरा लपवताना दिसला निक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा बुधवारी रात्री मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश अंबानीच्या प्री वेडिंग पार्टीत सहभागी झाली होती.  येथेच त्यांची भावी सून श्लोकाची मेंदी सेरेमनीसुद्धा पार पडली. विशेष म्हणजे यावेळी ती एकटी नव्हे तर तिचा तथाकथित बॉयफ्रेंड निक जोनासला सोबत घेऊन गेली होती. खास गोष्ट म्हणजे मीडियाचे कॅमेरे बघताच निक जोनासने संपूर्ण वेळ कारमध्ये चेहरा लपवला होता. फोटोजमध्ये निक अंबानींच्या घरी पोहोचेपर्यंत हाताने चेहरा झाकताना दिसतोय. आकाश अंबानीचा येत्या 30 जून रोजी हिरे व्यापारी रसैल मेहतांची धाकटी मुलगी श्लोकासोबत साखरपुडा आहे.   

 

गोव्याहून परताच प्रियांका पोहोचली पार्टीत...
- प्रियांका अलीकडेच निक जोनाससोबत गोव्यात हॉलिडे एन्जॉय करुन परतली आहे. बुधवारी गोव्याहून मुंबईत परताच ती पार्टीत पोहोचली. प्रियांका आणि निक एका कारने अंबानींच्या घरी पोहोचले. तर तिची आई मधू चोप्रा या दुस-या कारमधून पार्टीस्थळी दाखल झाल्या. पार्टीतून बाहेर पडल्यानंतर प्रियांकाने आईची गळाभेट घेऊन त्यांना रवाना केले. तर तीसुद्धा निकसोबत दुस-या कारमधून घरी रवाना झाली. प्रियांकाने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले, "आकाश आणि श्लोका तुमचे अभिनंदन. खूप सुंदर सेरेमनी होती. दोघांना खूप खूप प्रेम... प्री-प्री एंगेजमेंट पार्टी।"


महिन्याभरात प्रियांका करु शकते निकसोबत साखरपुडा...

- प्रियांका चोप्रा आणि निक जोनास  जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत साखरपुडा करण्याची शक्यता आहे. मंगळवारी फिल्मफेअर मॅगझिनने हे वृत्त दिले होते. प्रियांकाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्मफेअर मॅगझिनने हे वृत्त दिसल्याचे समजते. 22 जून रोजी निक प्रियांकासोबत भारत भेटीवर आला आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, अंबानींच्या पार्टीत क्लिक झालेली प्रियांकाची निवडक छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...