आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या बर्थडे पार्टीत स्टायलिश लूकमध्ये दिसल्या बेबो-लोलो, बघा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी अभिनेते रणधीर कपूर यांनी त्यांच्या 71 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत कपूर घराण्यातील अनेक सदस्यांनी उपस्थिती लावली होती. रणधीर कपूर यांची पत्नी बबिता, मुली करीना आणि करिश्मा यावेळी दिसल्या. करिश्माची दोन्ही मुले अर्थातच मुलगी समायरा आणि मुलगा किआन राज कपूर यांनी आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण करीनाचा मुलगा तैमुर आणि नवरा सैफ अली खान पार्टीत दिसले नाहीत. 


रणधीर यांच्या बहिणभावंडांची उपस्थिती...
रणधीर कपूर यांचे धाकटे भाऊ राजीव कपूर, बहीण रिमा जैन पार्टीत पोहोचले होते. रिमा जैनसोबत त्यांचे पती मोहित जैन आणि दोन्ही मुले अर्थातच अरमान आणि आदर जैन पार्टीत हजर होते. शिवाय रणधीर यांचे धाकटे भाऊ ऋषी कपूर आणि त्यांच्या पत्नी नीतू सिंग यादेखील यावेळी दिसल्या. पण त्यांचा मुलगा रणबीर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने पार्टीत उपस्थित राहू शकला नाही. 


ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या करिश्मा-करीना...
वडिलांच्या बर्थडे पार्टीत करिश्मा आणि करीना या दोघी बहिणी ग्लॅमरस लूकमध्ये स्पॉट झाल्या. रेड आणि ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये करिश्मा अतिशय सुंदर दिसली. तर करीनादेखील ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये नेहमीप्रमाणे आकर्षक दिसली. दोघींनीही फोटोग्राफर्सना त्यांच्या आईवडिलांसोबत पोज दिल्या.  


या पॅकेजमध्ये बघुयात, रणधीर कपूर यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक... 

बातम्या आणखी आहेत...