आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 Inside Pics : आदिराच्या बर्थडे पार्टीत तैमूरने वेधले लक्ष, रेखा, SRKसह दिसले पोहोचले हे सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची लाडकी लेक आदिरा 9 डिसेंबर रोजी दोन वर्षांची झाली.  आदिराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राणी-आदित्य यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत बॉलिवूडमधील फेमस सेलिब्रिटी सहभागी झाले होते. रेखा, शाहरुख खान, कतरिना कैफ,  वाणी कपूर, राज कुमार राव, अर्पिता खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी, करण जोहर, शमिता शेट्टी, श्रीदेवी यासह अनेक सेलिब्रिटी आदिराला बर्थडे विश करायला पोहोचले होते.

 

करीना-करण जोहरच्या मुलांनी वेधले लक्ष..

विशेष म्हणजे पार्टीत करीना आणि करण जोहर त्यांच्या मुलांसोबत पोहोचले होते. करीनाचा मुलगा तैमूर आणि करण जोहरची जुळी मुले यश आणि रुही यावेळी एकत्र एन्जॉय करताना दिसले. तैमूर हा रुही आणि यशचा बेस्ट फ्रेंड असल्याचे करणने सांगितले आहे.  या संपूर्ण पार्टीत  यश-रुही आणि तैमुर यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. 

 

पार्टीतील एकाही फोटोत दिसली नाही आदिरा...

राणी आणि आदित्य त्यांच्या लेकीला कायम मीडियापासून दूर ठेवतात. बर्थडे पार्टीतील समोर आलेल्या फोटोजपैकी एका फोटोत आदिरा दिसत नाहीये. शिवाय आदिराचे वडील आदित्य चोप्रासुद्धा फोटोत दिसत नाहीये. राणी मात्र सर्व सेलिब्रिटींसोबत एन्जॉय करताना दिसतेय. 

 

2014 मध्ये झाले होते राणी-आदित्यचे लग्न...
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी 21 एप्रिल 2014 रोजी इटलीत गुपचुप लग्न थाटले होते. त्यानंतर 9 डिसेंबर 2015 रोजी राणीने आदिराला जन्म दिला. आपले खासगी आयुष्य मीडियापासून कायम दूर ठेवणारी राणी आदिराच्या जन्मानंतर सात महिन्यांनी एअरपोर्टवर दिसली होती. जुलै 2016 मध्ये जेव्हा राणी कॅमे-यात कैद झाली, तेव्हा तिला ओळखणे कठीण झाले होते. मुलीच्या जन्मानंतर राणीचे वजन खूप वाढल्याचे या फोटोवरुन दिले होते.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, आदिराच्या बर्थडे पार्टीचे इनसाइड फोटोज..

बातम्या आणखी आहेत...