Home | Party | Jhanvi-Ishaan Dhadak Screening: Rekha To Madhuri Dixit And Arjun Kapoor Malaika Watched Dhadak

Dhadak Screening : काळा चश्मा लावून पोहोचल्या रेखा, सावत्र बहिणीसोबत दिसली जान्हवी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 20, 2018, 10:30 AM IST

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरच्या 'धडक' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी बुधवारी मुंबईत ठेवण्यात आले.

 • Jhanvi-Ishaan Dhadak Screening: Rekha To Madhuri Dixit And Arjun Kapoor Malaika Watched Dhadak

  मुंबईः जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर 'धडक' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी बुधवारी मुंबईत ठेवण्यात आले होते. स्क्रिनिंगला अभिनेत्री रेखा ब्लॅक अँड व्हाइट कलरच्या सूटमध्ये दिसल्या. त्यांनी रात्रीच्या वेळी डोळ्यांवर काळा चश्मा लावला होता. यावेळी त्यांची सेक्रेटरी फरजाना त्यांच्यासोबत होती. तर दुसरीकडे जान्हवी तिची सावत्र बहीण अंशुला कपूरसोबत एकाच कारमधून स्क्रिनिंगस्थळी दाखल झाली. धडकच्या मागील स्क्रिनिंगच्या वेळी अर्जुन कपूर शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये होता, त्यामुळे त्यावेळी तो स्क्रिनिंगला उपस्थित राहू शकला नव्हता. पण बुधवारी झालेल्या स्क्रिनिंगला तो आवर्जुन उपस्थित होता.

  या सेलिब्रिटींनी बघितला 'धडक'...
  - भाऊ अर्जुन आणि बहीण अंशुला यांच्याव्यतिरिक्त जान्हवीच्या कुुटंबातून तिचे वडील बोनी कपूर, सख्खी बहीण खुशी कपूर यावेळी हजर होती. तर ईशानच्या फॅमिलीतून त्याची आई नीलिमा अजीम, वडील राजेश खट्टर, सावत्र भाऊ शाहिद कपूर, वहिनी मीरा राजपूत स्क्रिनिंगला पोहोचली होती.
  - बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये मलायका अरोरा, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित, करण जोहर, सिकंदर खेर, आदर जैन, सारा खान, डेविड धवन, डिनो मोरिया, नेहा कक्कड, नेहा धूपिया, अंगद बेदी, अहान शेट्टी, कार्तिक आर्यन, शशांक खेतान, अपारशक्ति खुराणा यावेळी हजर होते.

  पहिल्या स्क्रिनिंगला उपस्थित होते कपूर घराणे...
  - 'धडक'च्या पहिल्या स्क्रिनिंगला ईशानच्या घरातून फक्त त्याची आई उपस्थित होती. इतर दुसरे फॅमिली मेंबर्स यावेळी हजर नव्हते.
  - तर जान्हवीचे कुटुंबीय मात्र उपस्थित होते. तिचे वडील बोनी कपूर, बहीण खुशी कपूर, अनिल कपूर, सुनीता कपूर, संजय कपूर, महीप संधू, सनाया कपूर, मोहित मारवाह, सोनम कपूर, रिया कपूरसह कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी जान्हवीचा डेब्यू चित्रपट बघितला होता.

  मराठी चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे धडक...
  - 'धडक' हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'सैराट' हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासाची नोंद करत 100 कोटींचा व्यवसाय केला होता.
  - 'सैराट' ही एक लव्ह स्टोरी असून हॉरर किलिंगवर आधारित आहे. यापूर्वी पंजाबीत हा चित्रपट 'चन्‍ना मेरेया' या नावाने बनवण्यात आला. तर ओडिया आणि बांग्ला भाषेतदेखील या चित्रपटाचे रिमेक बनले आहेत.

  पुढील स्लाईड्सवर बघा, धडकच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे खास PHOTOS...

Trending