आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कपूर यांनी सुरू केला होळी पार्टीचा ट्रेंड; आता यामुळे होत नाही सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चित्रपट जगतात होळी पार्टीची चर्चा होताच सर्वात आधी नाव येते ते राज कपूर यांचे. राज कपूर यांच्या निधनानंतर आरके स्टुडिओत होळी पार्टी बंद करण्यात आली. गेल्या 30 वर्षांपासून येथे होळी पार्टीचे सेलिब्रेशन झालेले नाही. तरीही आरके स्टुडिओत होळीचे प्रतिबिंब आणि प्रभाव आजही कायम आहे. राज कपूर यांनी 60 च्या दशकात या भव्य स्टुडिओत अशा प्रकारच्या पार्टीला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सव सुद्धा धूमधडाक्यात साजरे करण्याचा ट्रेंड सुरू केला होता. 

 

अशी खेळली जात होती होळी
- आरके स्टुडिओमध्ये मोठ-मोठे डबके बनवून त्यामध्ये पाणी भरले जात होते. प्रत्येक डबक्यात वेगवेगळे रंग मिसळले जायचे.
- यानंतर सगळेच स्टार्स या डबक्यांमध्ये उड्या मारायचे. होळी पार्टीला येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत अशा डबक्यांमध्ये फेकूणच केले जात होते. 
- जास्त नकार देणाऱ्यांना सगळे मिळून रंगांच्या हौदात फेकायचे. यानंतर होळीच्या रंगांत चिंब झालेले स्टार डीजेच्या इशाऱ्यांवर थिरकायचे. 
- आरके स्टुडिओमध्ये केवळ कपूर फॅमिलीच नव्हे, तर सिने जगतातील सगळेच स्टार आणि छोटे-मोठे कलाकार आमंत्रित केले जात होते. 
- राज कपूर गॉसिप आणि ग्लॅमर वर्ल्डचे राजा होते. त्यांच्या होळी पार्टीला त्यांच्या सगळ्याच हिरोइन्स अतिशय उत्साहाने सहभागी व्हायच्या. 
- ऐतिहासिक होळी पार्टीत नर्गिस, वॅजयंती माला, हेमामालिनी, धर्मेंद्र, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, जितेंद्र, दारा सिंह, राकेश रोशन, प्राण, प्रेमनाथ, मिथुन, राजेश खन्ना, अमिताभ, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी, रेखा, श्रीदेवी, झीनत अमान असे कलाकार होळीच्या मस्तीत सहभागी व्हायचे.
- 1988 मध्ये राज कपूर यांचे निधन झाले. तेव्हापासून होळी सेलिब्रेशन बंद झाले. यानंतर कपूर घराण्याने आरके स्टुडिओत होळी पार्टी सेलिब्रेट करण्यात उत्साह दाखवला नाही. आता या सेलिब्रेशनच्या फक्त आठवणी उरल्या आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आरके स्टुडिओत अशी साजरी व्हायची होळी...

बातम्या आणखी आहेत...