आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

London Film Festival 2018: मराठमोळ्या सई ताम्हणकरच्या \'लव सोनिया\'चा वर्ल्ड प्रीमिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार राव, ऋचा चड्ढा आणि मृणाल ठाकूरसोबत सई ताम्हणकर - Divya Marathi
राजकुमार राव, ऋचा चड्ढा आणि मृणाल ठाकूरसोबत सई ताम्हणकर

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच 'लव सोनिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमिअर द बगरी फाऊंडेशन लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2018 मध्ये करण्यात आला. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून सईची लव्ह सोनिया सिलेक्ट झाली होती. फेस्टिव्हच्या ओपनिंग सेरेमनीला रेड कार्पेटवर झाराच्या आउटफिटमध्ये सई ताम्हणकर आली.

 

मराठी फिल्म इंडस्ट्रीतली सई ताम्हणकर पहिली अभिनेत्री आहे, जिला लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक करायचा मान मिळाला. सईसोबत रिचा चड्ढा, राजकुमार राव, मृणाल ठाकूर, मनोज बाजपेयी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तबरेज नुरानीसुध्दा रेड कार्पेटवर दिसून आले.

 

यावेळी इंटरनॅशनल मीडियाशी बोलताना सई म्हणाली, “ माझ्या आजवरच्या प्रवासात बरेच चढ-उतार आले. पण ह्याक्षणी मागे वळून पाहताना त्या चढ-उतारांचे चीज झाल्याचे दिसते आहे. या सिनेमाने मला जास्त सतर्क आणि संवेदनशील बनवले. प्रत्येकाने ही फिल्म पहावी असं मला वाटतं. ह्या सिनेमातलं कथानक हृदयस्पर्शी आहे. या सुंदर इंडो-वेस्टर्न सिनेमाचा मी एक हिस्सा असल्याचा आणि हा चित्रपट लंडन इंडरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.”

 

हा सिनेमा तस्करीवर आधारित आहे. यात हरवलेल्या मुलांचे कटू सत्य दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तबरेज नुरानी यांनी केले आहे. तर निर्मिती ऑस्कर विजेता चित्रपट लाइफ ऑप पायचे निर्माते डेव्हिड वोमार्क यांनी केली आहे. प्रीमिअरच्या वेळी चित्रपटातील तारे लंडनमध्ये उपस्थित होते.   


या सिनेमामध्ये सई ताम्हणकर सोबत राजकुमार राव, रिचा चढ्ढा, मनोज वाजपेयी, अनुपम खेर हे बॉलिवूड स्टार आणि डेमी मोर आणि फ्रिडा पिंटो ह्या हॉलिवूड अभिनेत्री दिसणार आहेत. लव सोनिया सिनेमाचे शूटिंग मुंबई, जयपूर, हाँगकाँग आणि लॉस एंजलिसमध्ये झाले आहे.सप्टेंबरमध्ये ही फिल्म रिलीज होईल.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, रेड कार्पेटवर क्लिक झालेली लव सोनिया या सिनेमाच्या टीमची खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...