आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या दीपिका-रेखा, पत्नी गौरीसोबत पोहोचला शाहरुख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण, रेखा  आणि पत्नी गौरीसोबत शाहरुख खान - Divya Marathi
दीपिका पदुकोण, रेखा आणि पत्नी गौरीसोबत शाहरुख खान

रविवारी रात्री मुंबईत हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड सेलेब्सचा स्टायलिश आणि गॉर्जिअस लूक बघायला मिळाला. दीपिका पदुकोण व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली. तर अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरीसोबत पोहोचला. प्रसिद्ध अभिनेत्री रेखा गोल्डन कलरच्या साडीत पारंपरिक रुपात दिसली. याशिवाय कृती सेनन, मीरा राजपूत, पूजा हेगडे, रणवीर सिंह, लूलिया वंतूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कनिका कपूर, राजकुमार राव, श्वेता बच्चन, इसाबेल कैफसह अनेक सेलेब्स यावेळी रेड कार्पेटवर अवतरले होते. अभिनेता रणवीर सिंगला एंटरटेनर ऑफ द इयरच्या पुरस्कराने गौरविण्यात आले. रणवीरने त्याचा हा अवॉर्ड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना डेडिकेट केला.


हे सेलेब्स ठरले पुरस्काराचे मानकरी...

- या अवॉर्ड सोहळ्यात एंटरटेनर ऑफ द इयर फिमेलचा अवॉर्ड दीपिका पदुकोणला मिळाला.

- रायजिंग स्टार ऑफ द इयर ठरली अभिनेत्री कृती सेनन.

- करण जोहरला वर्सेटाइल पर्सनॅलिटी ऑफ द इयरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

- मोस्ट स्टायलिश मॅन ऑफ द इयर ठरला सिद्धार्थ मल्होत्रा.

- अभिनेता शाहिद कपूरला क्रिटिक्स बेस्ट अॅक्टर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर गौरी खान हिला एक्सिलन्स इन डिजाइन अवॉर्ड देण्यात आला.

- अभिनेत्री रेखा यांना सिनेमॅटिक आयकॉन ऑफ द इयरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलेब्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...