आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bollywood अॅक्ट्रेस श्वेता तिवारीची रिंग सेरेमनी, भावी पती चैतन्यला केले KISS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि अभिनेता चैतन्य शर्मा यांचा गुरुवारी साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर त्यांचे प्री वेडिंग बॅश झाले. या पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत. एका फोटोत श्वेता तिच्या भावी पतीचे चुंबन घेताना दिसतेय. तर आणखी एका फोटोत श्वेता चैतन्यसोबत तिच्या हातावरची मेंदी दाखवताना दिसतेय. तिने हातात आणि गळ्यात फुलांची माळ घातली आहे. या पार्टीत श्वेता पिंक कलरच्या लहेंग्यात दिसली. प्री वेडिंग बॅशमध्ये श्वेता-चैतन्यने मित्रांसोबत भरपूर धमाल मस्ती केली.


गोव्यात झाले डेस्टिनेशन वेडिंग...
- श्वेता आणि चैतन्य आज (29 जून) विवाहबद्ध झाले. गोव्यात त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केले. लग्नानंतर 30 जून रोजी पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये मित्र आणि जवळचे नातेवाईक सहभागी झाले आहेत.
- फार क्वचित लोकांना ठाऊक असावे दिल्लीचे माजी चीफ सेक्रेटरी पी.के.त्रिपाठी यांची कन्या असलेल्या श्वेताला बॉलिवूड अभिनेत्री व्हायचे नव्हते.
- तिचे रंगभूमीवर प्रेम होते, पण नशीब तिला चित्रपटांमध्ये घेऊन आले. तिने डिस्ने चॅनलच्या 'क्या मस्त है लाइफ' या शोसह काही शॉर्ट फिल्म्स आणि टीव्ही कमर्शियलमध्ये काम केले आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, श्वेता-चैतन्यच्या रिंग सेरेमनची फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...