Home | Party | Sonam Kapoor Celebrate Husband Anand Ahuja Birthday Surprise Gift For Anand

सोनम कपूरच्या नव-याला बर्थडेला सासरच्यांकडून मिळाले सरप्राइज गिफ्ट, जावयासोबत दिसली अनिल कपूरची खास बाँडिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 30, 2018, 05:18 PM IST

अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहुजा 35 वर्षांचे (29 जुलै) झाले आहे. रविवारी आनंद यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला.

 • Sonam Kapoor Celebrate Husband Anand Ahuja Birthday Surprise Gift For Anand

  एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहुजा 35 वर्षांचे (29 जुलै) झाले आहे. रविवारी आनंद यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला. नव-याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनमने एक खास केक बनवला होता. या केकमध्ये बास्केट बॉल ग्राऊंड दाखवण्यात आले होते. आनंद बास्केट बॉल प्लेअर आहेत. शिवाय त्यांना विविध प्रकारचे शूज कलेक्ट करण्याची आवड आहे. त्यामुळे सोनमची बहीण आणि आनंद यांची मेहुणी रिया कपूरने त्यांच्यासाठी बुटाच्या डिझाइनचा केक तयार करुन घेतला होता. रियाने इंस्टाग्रामवर आनंद यांचा एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये आनंद यांच्या हातात बुटाच्या डिझाइनचा केक दिसतोय. फोटो पोस्ट करुन रियाने लिहिले, 'हॅपी बर्थडे, मला ठाऊक नाही, तुम्हाला कसे शूज पाहिले, पण हा स्पेशल शू नक्कीच तुम्हाला पसंत पडेल.'


  बर्थडेला आनंद यांना मिळालेले अनेक सरप्राइज...
  - आनंद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या सासरच्यांकडून अनेक सरप्राइज मिळाले. अनिल कपूर त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत कुटुंबासोबत आनंद यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पोहोचले. अनिल सध्या त्यांच्या आगामी 'फन्ने खां' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत.


  - सोनमने आनंदसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करुन लिहिले, To the love of my life and the kindest gentlest soul I know, a very very happy birthday! You make my world better and I’m so blessed you were born today. “We are each of us angels with only one wing, and we can only fly by embracing one another.”

  - सोनमचे पती आनंद यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील अमेजन कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम केले होते. याचवर्षी त्यांनी भारतातील त्यांचे पहिले शू स्टोर ओपन केले आहे. त्याचे नाव 'वेज-नॉन वेज' आहे. आनंद लवकरच मुंबईत या स्टोरची दुसरी ब्रॅण्च ओपन करणार आहेत.

  - आनंद क्लोदिंग ब्रांड 'भाने'चे मालक आहेत. सोनम याच ब्रॅण्डचे कपडे पसंत करते. याशिवाय आनंद त्यांचा फॅमिली बिझनेस 'शाही एक्सपोर्ट्स'चे एमडी आहेत. सोनमची फ्रेंड प्रेरणा कुरैशी, आनंदची मैत्रीण आहे. तिच्या माध्यमातूनच दोघांची भेट झाली होती. 2014 मध्ये आनंद यांनी सोनमला प्रपोज केले होते.


  पुढील स्लाईड्सवर बघा, आनंद यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास Photos...

 • Sonam Kapoor Celebrate Husband Anand Ahuja Birthday Surprise Gift For Anand
 • Sonam Kapoor Celebrate Husband Anand Ahuja Birthday Surprise Gift For Anand
 • Sonam Kapoor Celebrate Husband Anand Ahuja Birthday Surprise Gift For Anand

Trending