आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या निधनानंतर पहिल्यांदाच इव्हेंटमध्ये दिसली धाकटी मुलगी, बोनी कपूरही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गुरुवारी रात्री मुंबईतील यशराज स्टुडिओत अभिनेत्री राणी मुखर्जीच्या आगामी 'हिचकी' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन हळूहळू पुर्वपदावर येत आहे. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांची धाकटी मुलगी खुशी एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये हजेरी लावताना दिसली. खुशी तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत स्क्रिनिंगला पोहोचली. दोघेही एकाच कारमधून कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या चेह-यावरचे उदास भाव स्पष्ट झळकत होते. या दोघांव्यतिरिक्त रेखा, माधुरी दीक्षित, तुषार कपूर, जितेंद्र, सुष्मिता सेन, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, आशुतोष गोवारिकर, पत्नी रुक्मिणीसोबत नील नीतिन मुकेश, आदर जैन, रीमा जैनसह आणखी काही सेलेब्स यावेळी दिसले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, 'हिचकी'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...