आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO+PICS: मामांसोबत चिमुकल्या तैमूरने केली धमाल-मस्ती, असा साजरा केला ख्रिससम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत शशी कपूर यांच्या घरी झालेल्या ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये एकत्र आलेली कपूर फॅमिली - Divya Marathi
दिवंगत शशी कपूर यांच्या घरी झालेल्या ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये एकत्र आलेली कपूर फॅमिली

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर बी टाऊनच्या सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. 20 डिसेंबर रोजी पतौडी पॅलेसमध्ये पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर तैमूरने कपूर फॅमिलीसोबत ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले. सोमवारी दुपारी तैमूर त्याच्या मम्मी-पप्पांसोबत हात पकडून पहिल्यांदा चालताना कॅमे-यात कैद झाला. 


शशी कपूर यांच्या घरी झाले सेलिब्रेशन..
दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या घरी दरवर्षी ख्रिसमस साजरा केला जातो. यंदाही कपूर कुटुंबीय शशी कपूर यांच्या घरी एकत्र आले. या ख्रिसमस पार्टीचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओजमध्ये तैमूर लक्ष वेधून घेतोय. 

 

चष्मा लावून मामांसोबत केली धमाल-मस्ती...
या ख्रिसमस बॅशचे इनसाइड फोटोज समोर आले आहे. या फोटोजमध्ये तैमूर त्याच्या मामांसोबत धमाल करताना दिसतोय. रणबीर कपूर, अरमान आणि आदर जैन ही तैमूरच्या मामांची नावे आहेत. अरमान जैनसोबत तैमूर नाचताना दिसतोय. फोटोज आणि व्हिडिओजमध्ये मामा-भाच्याची क्यूट केमिस्ट्री दिसतेय. नीतू कपूर यांनीसुद्धा रणबीर आणि तैमूरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका व्हिडिओत तैमूर काळा चष्मा लावून धमाल करताना दिसतोय. 


सैफ-करीना, रणबीर कपूर, ऋषी-नीतू कपूर, करिश्मा कपूर, कृष्णा राज कपूर, रीमा जैन, अदार जैन, अरमान जैन, कुणाल कपूर यांनी ख्रिसमस पार्टी एन्जॉय केली. या सगळ्यांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला चिमुकला तैमूर अली खान. 


तुम्हीही बघा, चिमुकल्या तैमूरचे कपूर फॅमिलीसोबतचे ख्रिसमस सेलिब्रेशन... चौथ्या आणि सहाव्या स्लाईड्सवर तैमूरचे क्यूट व्हिडिओ बघायला विसरु नका...

बातम्या आणखी आहेत...