आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Video Viral: Amitabh Bachchan Wife Jaya And Daughter Shweta Dance At Dishger Wedding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानलेल्या भावाच्या पार्टीत मुलीसोबत थिरकल्या जया बच्चन, झाला टाळ्यांचा कडकडाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड प्रसिद्ध फॅशन डिझायनर संदीप खोसला यांची भाची सौदामिनी मट्टू सिद्धार्थसोबत शनिवारी विवाहबद्ध झाली. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. संदीप खोसला यांचे निकटवर्तीय असलेले बच्चन कुटुंबदेखील या लग्नात आवर्जुन हजर होतं. या लग्नात अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ यांची लेक श्वेता बच्चन नंदा उपस्थित होते. लग्नातील एक व्हिडिओ समोर आले आहे, यामध्ये जया बच्चन त्यांची मुलगी श्वेतासोबत डान्स करताना दिसत आहेत. दोघीही 'शादी में जरूर आना' या चित्रपटातील गाजलेले गाणे 'पल्लो लटके'वर थिरकताना दिसत आहेत. जेव्हा या माय-लेकीने ताल धरला, तेव्हा तिथे टाळ्यांचा कडकडाट झाला. 


संदीप आणि अबू जानी आहेत जया यांचे मानलेले भाऊ...  
- फॅशन डिझायनर संदीप खोसला आणि अबू जानी हे दोघेही जया बच्चन यांचे मानलेले भाऊ आहेत. 
- अलीकडेच दोघांनी जया यांचा 70 वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, वेडिंग फंक्शनमध्ये पोहोचलेल्या बच्चन फॅमिलीचे PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...