आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: करिश्माने करिना, सोनमसोबत सेलिब्रेट केला बर्थडे, मावशीच्या कडेवर दिसला तैमूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बबिता, करीना, सैफ आणि मुले समायरा आणि कियानसोबत करिश्मा, दुसरीकडे करिश्माच्या कडेवर चिमुकला तैमूर - Divya Marathi
बबिता, करीना, सैफ आणि मुले समायरा आणि कियानसोबत करिश्मा, दुसरीकडे करिश्माच्या कडेवर चिमुकला तैमूर

मुंबईः अभिनेत्री करिश्मा कपूरने (25 जून) रोजी आपला 44 वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. यावेळी करिश्मा तिच्या कुटुंबीयांसोबत एन्जॉय करताना दिसली. करिश्माने पहिले सेलिब्रेशन हे कुटुंबीयांसोबत केले. या सेलिब्रेशनमध्ये तिची आई बबिता, करीना कपूर, सैफ अली खान, तैमूूर अली खान आणि करिश्माची मुले समायरा आणि कियान सहभागी झाले होते. यावेळी चिमुकला तैमूर त्याची मावशी करिश्मासोबत एन्जॉय करताना दिसला. तर करिश्माने दुसरे सेलिब्रेशन हे रात्री सोनम आणि करीनासोबत केले. 

 

करिश्मा तिच्या कुटुंबीयांसोबत गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये आहे. ती तेथील फोटोजसुद्धा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करतेय. बातमी होती, की करिश्माच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये तिचा तथाकथित बॉयफ्रेंड संदीप तोषनीवाल सहभागी होणार होता. पण संदीप एकाही फोटोत दिसला नाही. करिश्मा आणि संदीप गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असून लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. करिश्माने वडील रणधीर कपूर यांनी सांगितल्यानुसार, करिश्माला दुसरे लग्न करायला आमचा विरोध नाही. पण ती स्वतःच दुसरे लग्न करु इच्छित नाहीये. 


पुढील स्लाईड्सवर बघा, करिश्मा कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे निवडक फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...