आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Sanju Success Party\': संजूच्या स्टारकास्टने केली धमाकेदार पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजू चित्रपटाची संपुर्ण टीम - Divya Marathi
संजू चित्रपटाची संपुर्ण टीम

एन्टटेन्मेंट डेस्क : सध्या बॉक्सऑफिसवर 'संजू' चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाने घेत आहे. रणबीर कपूरचा चित्रपट 'संजू' 100 कोटीच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. राजकुमार हिराणींच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या संजू चित्रपटाने तीन दिवसांत 120 कोटींचा बिझनेस केला आहे. संजय दत्तच्या बायोपिकवर तयार करण्यात आलेल्या संजूमध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये या चित्रपटाने बाहुबली 2 लाही मागे टाकले आहे. 'बाहुबली 2' ने तिसऱ्या दिवशी 46.50 कोटींची कमाई केली होती. तर संजूने 46.71 कोटींची कमाई केली आहे. याच निमित्ताने चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. मुंबईच्या जुहूमध्ये ही सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पार्टीचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...