आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'कपूर अँड सन्स\' बघून रडला आमिर, आलिया-सिद्धार्थने मारली स्क्रिनिंगला दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा, पत्नी किरण रावसोबत आमिर खान - Divya Marathi
अनुष्का शर्मा, पत्नी किरण रावसोबत आमिर खान
मुंबईः मंगळवारी रात्री अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावसोबत 'कपूर अँड सन्स'च्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. मीडियाशी बोलताना आमिरने सांगितले, "सिनेमे बघून मी रडत असतो. हा सिनेमा बघूनसुद्धा मला रडू कोसळले. हा खूप इमोशनल सिनेमा आहे. सर्वच कलाकारांनी चांगले काम केले आहे. विशेषतः ऋषी सरांनी कमाल केली आहे."
आमिरसोबत दिसल्या त्याच्या बहिणी
आमिर खानच्या पत्नीसोबत त्याची थोरली बहीण निकहत आणि चुलत बहीण नुजहतसुद्धा स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या. याशिवाय अभिनेत्री अनुष्का शर्मा, करण जोहर, दिग्दर्शक राजकुमार हिराणी, डेविड धवन, जोया अख्तर लाइटबॉक्स थिएटरबाहेर दिसले. सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता फवाद खानसुद्धा स्क्रिनिंगला हजर होता. मात्र सिनेमातील त्याचे को-स्टार आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्राने स्क्रिनिंगला दांडी मारली होती. त्याचे कारण म्हणजे काल आलियाचा वाढदिवस होता.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'कपूर अँड सन्स'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...