Home »Party» Aamir Khan Birthday Party Inside Photos

आमिरच्या बर्थडे पार्टीत गुपचुप पोहोचला शाहरुख, पहिली पत्नी आणि मुलीचीही हजेरी

दिव्य मराठी वेब टीम | Mar 15, 2017, 15:02 PM IST

  • वर- पत्नी किरण रावसोबत आमिर, खाली - आमिरची मुलगी इरा, उजवीकडे - वर - पहिली पत्नी रिना दत्ता आणि खाली पार्टीत पोहोचलेला शाहरुख खान.
मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मंगळवारी (14 मार्च) वयाची 52 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने त्याची पत्नी किरण रावने आमिरसाठी खास बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत त्यांच्या नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. पार्टीत आमिरची पहिली पत्नी रीना दत्त, मुलगी इरा खान यांच्या व्यतिरिक्त महावीर सिंह फोगाट आणि त्यांच्या मुलगी गीता-बबिता सहभागी झाल्या होत्या.

आमिरच्या बर्थडे पार्टीत गुपचुप पोहोचला शाहरुख...
आमिरच्या बर्थडे पार्टीमध्ये घडलेली खास गोष्ट म्हणजे अभिनेता शाहरुख खान आमिरला शुभेच्छा द्यायला पोहोचला होता. शाहरुख गुपचुप पद्धतीने लेट नाइट पार्टीत सहभागी झाला होता. शाहरुखची उपस्थिती सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. त्याचे कारण म्हणजे शाहरुख आणि आमिर यांच्यातील कोल्ड वॉरची चर्चा पुर्वीपासूनच बॉलिवूडमध्ये रंगतेय.

पार्टीत पोहोचले हे बॉलिवूड सेलेब्स...
शाहरुखसह साक्षी तन्वर, सिद्धार्थ रॉय कपूर, आमिरचा भाचा इमरान, भाऊ फैजल खान, क्लोज फ्रेंड अमीन हाजी, फातिमा सना शेख हेदेखील पार्टीत सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, आमिर खानच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...

Next Article

Recommended