आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी भाईजान' पाहून आमिरला कोसळले रडू, अनेक सेलेब्सने पाहिला सिनेमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आमिर खान शनिवारी (18 जुलै) मित्र सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' सिनेमा पाहण्यासाठी लाइट बॉक्स थिएटरमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत मुलगी इरा आणि भाऊ फैजल खानसुध्दा होता. विशेष म्हणजे, सिनेमामध्ये सलमानचा अभिनया पाहून आमिर भावूक झाला आणि त्याला रडू कोसळले. स्क्रिनिंगनंतर आमिर बाहेर आल्यानंतर त्याला डोळे पुसताना पाहिल्या गेले. त्याने टि्वटरवर 'बजरंगी भाईजान'ची भरभरून प्रशंसा केली आणि हा सलमानचा आतापर्यंतचा सर्वाच चांगला सिनेमा असल्याचे सांगितले.
आमिरने लिहिले, 'Just came out of Bajrangi Bhaijaan. OUTSTANDING! Salman's best film till today! Salman's best performance till today.' सोबतच त्याने चाहत्यांना आग्रह केला, की एकदा तरी हा सिनेमा पाहावा. इतकेच काय, आमिरने टि्वटरवर कबीर खान दिग्दर्शानाची, सिनेमाच्या कहाणीची, स्क्रिनप्लेची आणि डायलॉग्सची खूप प्रशंसा केली.
आमिरने सिनेमातील बालकलाकार शाहिदा अर्थातच मुन्नी अर्थातच हर्षालीचीसुध्दा स्तुती केली. त्याने लिहिले, 'And that little girl is too too good! Just steals your heart!'
स्क्रिनिंगमध्ये पोहोचले अनेक सेलेब्स-
'बजरंगी भाईजान'च्या स्क्रिनिंगमध्ये आमिरशिवाय रितेश साधवानी आणि त्याची पत्नी डॉली, संजय कपूर आणि त्याची पत्नी महिपसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा मागील शुक्रवारी (17 जुलै) रिलीज झाला. सिनेमाने पहिल्या दोन दिवसांत 63.75 कोटींचा बिझनेस केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...