आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day ला आराध्या बनली डिस्ने प्रिंसेस, पार्टीत मुलांसोबत पोहोचले अनेक स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे (वर) - आई ऐश्वर्यासोबत प्रिंसेस लूकमध्ये बर्थडे गर्ल आराध्या, (खाली) - मुलगा वियानसोबत राज कुंद्रा, उजवीकडे (वर) - आई ऐश्वर्यासोबत आराध्या, (खाली) - आराध्याचा बर्थडे केक - Divya Marathi
डावीकडे (वर) - आई ऐश्वर्यासोबत प्रिंसेस लूकमध्ये बर्थडे गर्ल आराध्या, (खाली) - मुलगा वियानसोबत राज कुंद्रा, उजवीकडे (वर) - आई ऐश्वर्यासोबत आराध्या, (खाली) - आराध्याचा बर्थडे केक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चन हिने सोमवारी आपला चौथा वाढदिवस साजरा केला. आराध्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बच्चन फॅमिलीने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनचे अनेक स्टार्स आपापल्या मुलांसोबत पोहोचले.
पार्टीच बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यात झआली. पाहुण्यांमध्ये अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना यांची मुलगी नितारा, लारा दत्ता-महेश भूपती यांची लेक सायरा, रितेश-जेनेलिया देशमुख यांचा मुलगा रियान, शिल्पा-राज कुंद्रा यांचा मुलगा वियान, डब्बू रत्नानी, कोंकणा सेन शर्मा, रवीना टंडन, सोनाली आणि गोल्डी बहल, तारा शर्मा आणि अभिषेकचा जवळचा मित्र रोहन सिप्पी यांच्या नावाचा समावेश होता.
प्रिंसेस थीम पार्टी
ऐश्वर्याने आपल्या लाडक्या लेकीसाठी प्रिंसेस थीमवर पार्टी आयोजित केली होती. याचे कारण म्हणजे आराध्याला डिस्ने प्रिंसेस पसंत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बर्थडे पार्टीसाठी मागील चार दिवसांपासून तयारी सुरु होती.
रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या पार्टीत सर्वच पाहुण्यांनी खूप एन्जॉय केले. पार्टीनंतर सर्व चिमुकली मुले आपल्या सेलिब्रिटी पॅरेंट्ससोबत रिटर्न गिफ्ट घेऊन परतले.
आराध्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले होते. "आराध्या रात्री माझ्याजवळ आली तेव्हा मी तिला म्हटले, उद्या सकाळी उठल्यानंतर तुझा वाढदिवस असेल, सर्वजण तुला शुभेच्छा देतील, गिफ्ट देतील. तिने लगेच म्हटले, मीसुद्धा त्यांना गिफ्ट देईल. ती रिटर्न गिफ्टविषयी बोलत होती."
तर दुसरीकडे अभिषेकने आराध्याचे स्केच शेअर करुन लिहिले, "हॅपी बर्थ डे - माझी छोटी परी. हे स्केच एका प्रतिभावंत कलाकाराने तयार केले आहे. त्यांना थँक यू. आराध्याला हे स्केच खूप आवडले."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आराध्याच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या पाहुण्यांची खास झलक...