आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 INSIDE PHOTOS : आराध्याच्या B\'day पार्टीत चिमुकल्या अबरामने केले बिग बींसोबत एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः ऐश्वर्या-अभिषेक यांची लाडकी लेक आराध्या 16 नोव्हेंबर रोजी सहा वर्षांची झाली. यानिमित्ताने शनिवारी बच्चन फॅमिलीने त्यांच्या जुहूस्थित 'प्रतीक्षा' बंगल्यावर बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसोबत सहभागी झाले होते. पार्टीत अभिनेता शाहरुख खान त्याचा चिमुकला अबरामसोबत तर आमिर खान मुलगा आझाद राव खानसोबत पोहोचला. यावेळी अबराम शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत एन्जॉय करताना दिसला. या पार्टीचे काही फोटोज अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यापैकी काही फोटोजमध्ये अबरामचे कॉटन कँडी मिळाल्यानंतरचे क्यूट एक्सप्रेशन्स बघायला मिळत आहेत.

 

बिग बींनी फोटो शेअर करुन लिहिले,  ''And as for this little bundle .. he wanted the fluffy 'buddhi ka baal' cone .. so we took him to the stall made one for him and the joy of getting it is just priceless .. Abram, jr Shahrukh .. delectable !!'' 

 

एक आणखी एका फोटोत आराध्या तिची आजी जया बच्चन यांना केक भरवताना दिसतेय. आराध्याचा जया बच्चन यांना केक भरवतानाचा फोटो शेअर करुन बिग बींनी लिहिले, "And the birthday girl glows at her celebration .. demure in her new dress .. considerate in sharing her cake .. and the pride of the family .. girls always are ."

 

या सेलिब्रिटी किड्सनी एन्जॉय केली आराध्याची बर्थडे पार्टी...
- आराध्याच्या बर्थडे पार्टीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुलगा वियानसोबत पोहोचली. तर सोनाली बेंद्रेसुद्धा तिच्या मुलासोबत पार्टीत दाखल झाली. 
- संजय दत्तची मुले शाहरान आणि इकरासह फराह खानच्या तिळ्या मुलांनीही पार्टीत भरपूर एन्जॉय केले.
- तारा शर्मा, सोनाली कुलकर्णी, बंटी वालिया, सनी दीवान आणि डब्बू रत्नानीसुद्धा त्यांच्या मुलांसोबत पार्टीत पोहोचले होते.
- आराध्याच्या बर्थडे पार्टीचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसत आहेत. पार्टीत ऐश्वर्याच्या आई वृंदा राय यांनीही उपस्थिती लावली होती.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, आराध्याच्या बर्थडे पार्टीचे INSIDE PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...