आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड अॅक्टरने वडिलोपार्जित गावात केले मुलीचे धुमधडाक्यात लग्न, सेलिब्रिटींपैकी कोणीच नव्हते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या मेव्हणीसोबत बोलताना राजपालचा जावई. - Divya Marathi
छोट्या मेव्हणीसोबत बोलताना राजपालचा जावई.

शाहजहांपूर/मुंबई - काही कलाकार हे कायम मातीशी नाळ जोडून असतात. ते बॉलिवूडमध्ये कितीही मोठे झाले तरी आपल्या पाळामुळांना विसरत नाही, त्यापैकीच एक कलाकार आहे राजपाल यादव. बॉलिवूड अॅक्टर राजपाल यादवची मुलगी ज्योती रविवारी (19 नोव्हेंबर) नवरी झाली होती.  राजपालने मुलीसाठी बॉलिवूडमधील नाही तर आग्रा येथील एका बँक कर्मचाऱ्याची जावई म्हणून निवड केली. या लग्नाला बॉलिवूडमधील एकही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. राजपालची पहिली पत्नी करुणाची ज्योती मुलगी आहे. ज्योतीच्या जन्मावेळीच करुणाचा मृत्यू झाला होता. राजपालचे वडिलोपार्जित घर उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे आहे, येथेच हे लग्न झाले. 

 

इटावाहून आला ज्योतीच वर
- राजपाल यादवचे छोटे बंधू राजेश यांनी सांगितले, की आमचे जावई ईटावा येथील आहेत. दोन वर्षांपासून ते आग्रा येथील बँकेत कॅशियरची नोकरी करत आहेत. 
- ज्योतीचे लग्न कुंडरा गावात झाले. ज्योतीच्या आईच्या निधनानंतर जवळपास 15 वर्षे ती कुंडरा येथेच राहिली होती. गेल्या 5 वर्षांपासून ती वडीलांसोबत मुंबईत राहात होती. 

 

कॅनाडमध्ये राजपालला मिळाले दुसरे प्रेम
- राजपाल यादवने 10 जून 2003 ला राधासोबत दुसरे लग्न केले होते. राधा आणि राजपाल यांना हनी नावाची एक छोटी मुलगी आहे. 
- राजपाल हिरो फिल्मच्या शूटसाठी कॅनडाला गेला होता तेव्हा राधा आणि राजपाल यांचा कॉमन फ्रेंड प्रवीण डबस यांच्या माध्यमातून राधाची भेट झाली होती. 

- कॅनडामध्ये जन्मलेल्या राधाला राजपाल पहिल्या भेटीतच पसंत आले होते. दोघांच्या उंचीमध्ये दोन इंचांचा फरक आहे, असे असूनही दोघांची बॉन्डिंग चांगली आहे. 
- एका मुलखतीत राधाने सांगितले होते, की मी प्रथम मुंबईत आले तेव्हा राजपाल मला त्यांच्या घरी घेऊन गेले होते. त्यांनी मला इंम्प्रेस करण्यासाठी घराचे इंटेरियर तसेच केले होते, जसे कॅनडातील त्या हॉटेलचे होते, जिथे आमची पहिली भेट झाली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, वराची विचारपूस करत आहे सासरे राजपाल यादव... 

बातम्या आणखी आहेत...