आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan And Celebs At 'Jazbaa' Wrap Up Party

PICS: ऐश्वर्याने अटेंड केली 'जज्बा' की रॅप-अप PARTY, इरफान खान अनुपस्थित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या एका लोकप्रिय पबमध्ये दिग्दर्शक संजय गुप्ताने 'जज्बा' या आगामी सिनेमाची रॅप-अप पार्टी आयोजित केली होती. रविवार रात्री (20 सप्टेंबर) ठेवण्यात आलेल्या या पार्टीत मुख्य अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. ऐश्वर्याला लाँग ब्लू अँड सिल्वर आऊटफिटमध्ये दिसली. तिने आपल्या लूकला रेड लिपस्टिक आणि सिल्वर पम्प्सने कम्पलीट केले होते.
'जज्बा'च्या रॅप-अप पार्टीत सिनेमाचे सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते. मात्र इव्हेंटमध्ये सिनेमाचा मुख्य अभिनेता इरफान खान दिसला नाही. ऐश्वर्याशिवाय दिग्दर्शक संजय गुप्ता, अभिनेता आणि निर्माता सचिन जोशी, अतुल कुलकर्णी, चंदन रॉय, सिंगर निलोफर वाणी, सिंगर आर्को मुखर्जी, सिंगर जोडी अजमद-नदीमसह अनेक सेलेब्स पार्टीचा हिस्सा बनले होते.
'जज्बा'मधून ऐश्वर्या राय बच्चन जवळपास 5 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. इव्हेंटमध्ये अॅशने सांगितले, की आता ती सिनेमा रिलीज होण्याची प्रतिक्षा करत आहे. सिनेमात ती एका वकिलाच्या पात्रात दिसणार आहे. हा एक अॅक्शन-ड्रामा सिनेमा असून 9 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा 'जज्बा'च्या रॅप-अप पार्टीचे फोटो...