नुकतेच 'सरबजीत' सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाले. या ट्रेलरची सर्वत्र खूप धूम आहे. ऐश्वर्या यातील अभिनय सर्वांना भूरळ घालणारा आहे. तसेच ट्रेलरमधील तिच्या लूकचीसुद्धा खूप चर्चा रंगली आहे. अलीकडेच या ट्रेलर लाँचिंगचा इव्हेंट झाला. या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या बार्बी डॉल लूकमध्ये दिसली.
ऐश्वर्याने डिझाइनर आयशा रमाधानचा आऊटफिट कॅरी केला होता. पिंक रंगाच्या या ड्रेसमध्ये ऐश्वर्या एखाद्या बाहूलीसारखी दिसत होती. या पिंक ड्रेससोबत तिने हायहिल्स आणि केस मोकळे सोडले होते. ऐश्वर्याच्या अगदी आकर्षक दिसत असल्याने तिच्या चाहत्यांना तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
इव्हेंटमध्ये ऐश्वर्या जरी ग्लॅम डॉलसारखी दिसली असली तरी 'सरबजीत' सिनेमात ती नॉन-ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. सिनेमात ऐश्वर्या सरबजीतची बहीण दलबीरच्या भूमिकेत दिसणार आहे. या लाँचिंग इव्हेंटमध्ये सिनेमात सरबजीतच्या भूमिकेत दिसणारा रणदीप हुड्डासुध्दा पोहोचला होता. सोबत दिग्दर्शक उमंग कुमारसुध्दा यावेळी स्पॉट झाले. सिनेमात सरबजीतच्या भूमिकेत दिसणा-या रिचा चढ्डासह संपूर्ण टीम या इव्हेंटमध्ये पोहोचली होती.
सिनेमा येत्या 20 मे 2016ला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐश्वर्याचा ग्लॅम डॉल लूक आणि इव्हेंटचे फोटो...