आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AICW: तब्बल पाच वर्षांनंतर रॅम्पवर अवतरली माजी जगतसुंदरी, पाहा तिच्या दिलखेचक अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः मनीष मल्होत्रासोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन)
मुंबईः अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक 2015चा ग्रॅण्ड फिनाले अलीकडेच मुंबईत पार पडला. या ग्रॅण्ड फिनालेत 40 वर्षीय ऐश्वर्या राय बच्चनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या लाँग गाऊनमध्ये ऐश्वर्या एखाद्या परीसारखी दिसली. तब्बल पाच वर्षांनंतर ही माजी जगतसुंदरी मनीष मल्होत्राच्या कलेक्शनसाठी रॅम्पवर अवतरली होती.
मनीषने या फॅशन शोमध्ये आपले 'The Empress Story' कलेक्शन सादर केले. या शोची ऐश्वर्या शो स्टॉपर होती. विशेष म्हणजे तब्येत ठिक नसतानासुद्धा ऐश्वर्या रॅम्पवर अवतरली होती.
या फॅशन शोला शबाना आझमी, कृती सेनन, सोफी चौधरी, अदिती राव हैदरी या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. शिवाय ऐश्वर्याच्या सासूबाई जया बच्चनसुद्धा आपल्या सुनेला चिअरअप करण्यासाठी आवर्जुन हजर होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रॅम्पवर अवतरलेल्या ऐश्वर्याचा दिलखेचक अंदाज...
बातम्या आणखी आहेत...