मुंबईः तब्बल पाच वर्षांच्या ब्रेकनंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे. अलीकडेच तिच्या आगामी 'जज्बा' या सिनेमातील पहिले गाणे लाँच करण्यात आले. गायक जुबीन नौटियालने स्वरबद्ध केलेल्या बंदेया या गाण्याच्या लाँचिंगला सिनेमातील मुख्य अभिनेता इरफान खानला वगळता संपूर्ण स्टारकास्ट हजर होती.
यावेळी ऐश्वर्या रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांनी डिझाइन केलेल्या ब्लू टॉप आणि ब्लॅक डेनिममध्ये आकर्षक दिसली. मीडियाशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली, की हे गाणे शूट करण्यासाठी विशेष असे प्लानिंग करणअयात आले नव्हते.
ऐश्वर्यासह दिग्दर्शक संजय गुप्ता, जॅकी श्रॉफ, अहमद खान, गायक जुबीन नौटियाल, सिद्धांत कपूर, प्रिया बॅनर्जी या इव्हेंटमध्ये उपस्थित होते. येत्या 9 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटमध्ये क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...