आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay, Amy & Prabhudheva Arrive On Tractor At 'Singh Is Bling' Trailer Launch

ट्रॅक्टरवर हीरोईनसोबत स्वार होऊन अक्षयने केली धमाकेदार एन्ट्री, लाँच केला सिनेमाचा TRAILER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील चंदन थिएटरमध्ये अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी 'सिंह इज ब्लिंग'चा ट्रेलर लाँच केला. उल्लेखनीय बाब म्हणजे. या इव्हेंटमध्ये अक्षयने ट्रॅक्टरवर स्वार होऊन एन्ट्री केली. यावेळी सिनेमाची हीरोईन एमी जॅक्सन आणि दिग्दर्शक प्रभूदेवा त्याच्यासोबत होते. ढोलताशाच्या गजरात या तिघांनी धमाकेदार एन्ट्री घेतली.
रेड आउटफिटमध्ये एमी, अक्षयने घातली पगडी
इव्हेंटमध्ये एमी जॅक्सनने डिझायनर स्वाती सिंहने डिझाइन केलेला रेड गाउन परिधान केला होता. तिने आपला हा लूक मिनेरली आणि अनमोल ज्वेलरीने पूर्ण केला. तर दुसरीकडे अक्षय पंजाबी गेटअपमध्ये दिसला. इव्हेंटसाठी त्याने ब्लॅट सूट, व्हाइट शर्ट, पिंक टाय आणि ब्लॅक पगडीची निवड केली.
प्रभूदेवा दिग्दर्शित या सिनेमाचा निर्माता अक्षय कुमार आहे. अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेला हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. सिनेमात के.के. मेनन आणि लारा दत्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्रेलर लाँचिंगवेळी क्लिक झालेली या स्टार्सची खास झलक...