आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Family At Airlift Special Screening

अक्षयच्या फॅमिली-फ्रेंड्सनी पाहिला 'Airlift', पत्नी आणि मुलाने केले सिनेमाचे कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर, ट्विंकल खन्ना आणि आरव कुमार. खाली, अक्षय कुमार - Divya Marathi
वर, ट्विंकल खन्ना आणि आरव कुमार. खाली, अक्षय कुमार

मुंबईः गुरुवारी मुंबईत अक्षय कुमार स्टारर 'एअरलिफ्ट' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी अक्षयच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या निवडक मित्रांनी हा सिनेमा पाहिला. अक्षयचा मुलगा आरवने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सिनेमा बघितल्यानंतर वडिलांच्या कामाचे आणि सिनेमाचे कौतुकही केले. अक्षयची पत्नी ट्विंकलने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती देताना म्हटले, "Son saw #Airlift & said'Mom you always nag dad-he works too much -after seeing this-isn't it worth it?'One of MrK's finest films @RajaMenon."
ट्विंकल म्हणाली, भारतीय असल्याचा गर्व वाटावा असा आहे 'एअरलिफ्ट'
ट्विंकलने आणखी एका ट्विटच्या माध्यमातून सिनेमाचे कौतुक केले. ती म्हणाली, हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला भारतीय असल्याचा गर्व वाटले, ती म्हणाली, "Airlift is a brilliant brilliant film-Gritty,entertaining and heartwarming. A true story that makes you feel proud to be an Indian #Airlift"
वेगवेगळ्या कारमधून थिएटरमध्ये पोहोचले फॅमिली मेंबर्स
अक्षय कुमारचे कुटुंबीय वेगवेगळ्या कारमधून थिएटरमध्ये पोहोचले. अक्षय आपल्या काही मित्रांसोबत दिसला. तर ट्विंकल, मुलगा आरव, सासूबाई अरुणा भाटिया, आई डिंपल कपाडियासोबत दिसली. स्क्रिनिंगला अक्षयची बहीण अलका भाटियासुद्धा पोहोचली होती.
पुढे पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या अक्षयच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...