आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग लोकेशनवर पोहोचला अक्षयचा मुलगा, पत्नी आणि मुलगीसुध्दा दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमारचा मुलगा आरव, मुलगी नितारा आणि पत्नी टि्ंवकल खन्ना
जोधपूर- अभिनेता अक्षय कुमार आपल्या कुटुंबीयांसोबत गुरुवारी (12 नोव्हेंबर) मुंबईहून जोधपूरला पोहोचला. तो येथे चालू असलेल्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी पोहोचला होता. अक्षयची पत्नी टि्ंवकल खन्ना, मुलगा आरव आणि मुलगी नितारासुध्दा सोबत दिसले. शिवाय निम्रत कौर आणि निनाद कामतसुध्दा जोधपूरला पोहोचले होते. हे सर्व स्टार्स येथे 'एअरलिफ्ट' सिनेमाच्या शूटिंगसाठी आले होते.
एअरपोर्टवर दिसले आनंदित, अक्षयसह सर्वांनी केली प्रशंसा-
दैनिक भास्कर तसेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जोधपूरने दीपावलीच्या निमित्तावर सर्व पाहूण्यांचे स्वागत केले. यानिमित्तावर एअरपोर्टवर भव्य दिवे लावण्यात आले होते. पाहूण्यांचे स्वागत चॉकलेट आणि दिवाळी कार्ड देऊन करण्यात आले. यावेळी एअरपोर्टचा संचालक एसके सिंह यांनी सांगितले, की हा क्षण खूपच रंजक आहे. सर्व पाहूण्यांचे दोन दिवस स्वागत करण्यात आले.
यावेळी जोधपूरली येणारे सेलिब्रिटी अक्षय कुमार, टि्ंवकल खन्नासह सह कलाकार निनाद, मकसूद, अहमद, मिस वर्ल्ड फायनालिस्ट तसेच मॉडेल निमृत कौर, इंडियन आयडल फेम स्वरुप खाननेसुध्दा या स्वागताची प्रशंसा केली. कार्यक्रमात दिलीप भाटी आणि विनोद वैष्णवसुध्दा होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जोधपूरला पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...