आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खिलाडी'ने मालदीवमध्ये सेलिब्रेट केला B'day, शेअर केला पत्नी-मुलांसोबतचा सुरेख Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षयने शेअर केलेला आपल्या कुटुंबाचा सुरेख फोटो - Divya Marathi
अक्षयने शेअर केलेला आपल्या कुटुंबाचा सुरेख फोटो
एन्टरटेन्मेंट डेस्कः खिलाडी कुमारने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. सहसा कामात व्यस्त असणाऱ्या अक्षयने यंदा त्याचा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा केला. मालदीव बेटांवरील नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात त्याने पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारासह काही निवांत क्षण घालवले. अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन मालदीवचे काही सुरेख फोटो शेअर केले आहेत.

एक साजेसे कॅप्शन देत अक्षयने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब एकमेकांचे हात पकडून पाठमोरे दिसत आहेत. वाढदिवशी इतर कलाकारांप्रमाणे पार्टी करण्याला प्राधान्य न देता यंदा अक्षयने त्याचा वेळ त्याच्या कुटुंबासाठी दिला होता. ट्विंकल आणि अक्षय या दोघांनीही त्यांचे फोटो ट्विट करत काही सुरेख कौटुंबिक क्षण चाहत्यांसमवेत शेअर केले आहेत. सध्या अक्षय त्याचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अक्षयने शेअर केलेले खास फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...