Home »Party» Alia Bhatt Celebrate With Fan And Pap On Her Birthday

आलियाने फॅन्ससोबत साजरा केला बर्थडे, पार्टीत पोहोचले शाहरुख-करण

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 17:29 PM IST

मुंबईः करण जोहर 'स्टूडंट ऑफ द ईयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट हिने नुकतीच वयाची 24 वर्षे पूर्ण केली आहेत. 15 मार्च रोजी आलियाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने आलियाने तिच्या जुहूस्थित घरी फॅन्ससोबत वाढदिवस साजरा केला. तिने फॅन्ससोबत सेल्फीदेखील घेतली. अलीकडेच आलियाचा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय.
आलियाच्या प्री-बर्थडे पार्टीत पोहोचले सिद्धार्थ-अयान...
आलियाच्या प्री-बर्थडे पार्टीत तिचा को-स्टार आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा सहभागी झाला होता. याशिवाय अयान मुखर्जी, शाहरुख खान आणि करण जोहर यांनीही आलियाच्या बर्थडे पार्टीत हजेरी लावून तिला शुभेच्छा दिल्या.

पुढील स्लाईड्सवर बघा, आलिया भटच्या बर्थडे सेलिब्रेशनचे PHOTOS...

Next Article

Recommended