आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia, Kangana, SIZZLE At Masaba Madhu’S Sangeet Ceremony

कंगना रनोट बनली श्रीदेवी, फॅशन डिझायनरच्या संगीत सेरेमनीत केला डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परफॉर्म करताना दिग्दर्शक विकास बहल आणि कंगना रनोट - Divya Marathi
परफॉर्म करताना दिग्दर्शक विकास बहल आणि कंगना रनोट

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड निर्माता मधू मंतेना अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत लग्नगाठीत अडकले. शनिवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये अभिनेत्री कंगना रनोट श्रीदेवीच्या लूकमध्ये डान्स परफॉर्मन्स देताना दिसतेय.
कंगना बनली रेट्रो क्वीन
कंगनाने श्रीदेवी-जितेंद्र स्टारर 'हिम्मतवाला' या सिनेमातील 'नैनों में सपना' या गाण्यावर डान्स केला आणि मजेशीर बाब म्हणजे तिने हा डान्स क्वीनचे दिग्दर्शक विकास बहलसोबत केला. दोघांनी आपल्या सादरीकरणाने पाहुण्यांचे भरपूर मनोरंजन केले.
मित्र बनला होस्ट
बातम्यांनुसार, दिग्दर्शक विकास बहल आणि अभिनेता जॅकी भगनानी यांनी हा कार्यक्रम होस्ट केला. या कार्यक्रमात सर्वप्रथम जया बच्चन पोहोचल्या होत्या. त्यांनी वर-वधूला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डान्सच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
स्टार्सचे नाच-गाणे
कंगना आणि विकास यांच्यासह अनेकांनी स्टेजवर ताल धरला होता. शाहिद कपूरने 'लुंगी डान्स' या गाण्यावर परफॉर्म केले. याशिवाय शाहिदने पत्नी मीरासोबत 'तू मेरे अगल बगल' या गाण्यावरही ताल धरला होता. अभिनेत्री आलिया भट आणि तिची बहीण शाहिन यांनी 'शानदार'मधील 'गुलाबो' आणि 'दिल धडकने दो'मधील 'गल्ला गुडिया' या गाण्यावर डान्स केला.
खाणे-पिणे
बातम्यांनुसार, या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी तब्बल 53 प्रकारच्या डिशेज होत्या. यामध्ये बिर्यानी, चिकन टिक्का, मटन रोगन गोस्त आणि पनीरचा समावेश होता. डेजर्टमध्ये जलेबी, केसर पिस्ता कुल्फी आणि रबडीचा समावेश होता. कॅलरी कॉन्शिअस गेस्टसाठी सलाद, फ्रूट्स आणि स्पेशल कॉकटेलची सोय करण्यात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, संगीत सेरेमनीतील इनसाइड फोटोज...