आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan, Aishwarya Rai And Others At The Premier Of Sachin A Billion Dreams

सचिनच्या फिल्मच्या स्क्रिनिंगला अवतरले तारांगण, सलमानला वगळता पोहोचले अनेक Celebs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'सचिन : अ बिलियन ड्रीम्स\' या सिनेमाच्या प्रीमिअरला पोहोचलेले बॉलिवूड सेलेब्स - Divya Marathi
\'सचिन : अ बिलियन ड्रीम्स\' या सिनेमाच्या प्रीमिअरला पोहोचलेले बॉलिवूड सेलेब्स
मुंबईः क्रिकेटचा 'देव' म्हणून ओळखला जाणा-या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेला 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा 26 मे रोजी रिलीज होतोय. तत्पूर्वी बुधवारी मुंबईत या सिनेमाचा ग्रॅण्ड प्रीमिअर पार पडला. या प्रीमिअरला बॉलिवूडमधून अनेक कलाकार पोहोचले होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या आणि मुलगा अभिषेकसोबत प्रीमिअरला हजेरी लावली. याशिवाय शाहरुख खान, आमिर खान, आशा भोसले, अनिल कपूर, जॉन अब्राहम, श्रेया घोषाल, सोनू निगम आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलेब्स प्रीमिअरला दिसले. पण या सगळ्यांमध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खान अनुपस्थित होता. सलमान 'ट्यूबलाइट' या त्याच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच करुन मंगळवारीच दुबईहून मुंबईत परतला आहे. 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या प्रीमिअरला भाव खाऊन गेली सचिनची लाडकी लेक

ए. आर. रहमान यांनी दिले सिनेमाला संगीत
- दिग्दर्शक जेम्स एर्सकाइन यांच्या 200 नॉटआउट प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये तयार झालेल्या या बायोग्राफिकल सिनेमाला रवी भागचंदका आणि कार्निवाल मोशन पिक्चर्सने प्रोड्युस केले आहे.
- 26 मे रोजी रिलीज होत असलेल्या या सिनेमाचे ए. आर. रहमान संगीतकार आहेत. शाहरुखसोबत दिसली सचिनची खास बाँडिंग, शिखर धवनच्या मुलासोबत युवीची धमाल, बघा Inside Photos

पुढील स्लाईड्सवर बघा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...