मुंबईः शुक्रवारी मुंबईत एका फॅशन शो इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या थीमवर आधारित असलेल्या या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक नामांकित चेहरे दिसले. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा, हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गीतकार प्रसून्न जोशीसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
जया आणि श्वेता बच्चन नंदा यांनी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी रॅम्पवॉक केला. विशेष म्हणजे यावेळी श्वेता आणि सुझान एकत्र रॅम्पवर अवतरल्या होत्या. हा शो ब्रेकथ्रू या ग्लोबल ह्युमन राइट्स ऑर्गनाइजेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ही संस्था स्त्रियांवर होणा-या अत्याचाराविरोधात काम करते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटमध्ये क्लिक झालेली सेलेब्सची खास छायाचित्रे...