Home »Party» Amitabh Bachchan Shared Wedding Pics On Social Media

33 PHOTOS : बच्चन कुटुंबात झाले नववधूचे जंगी स्वागत, बघा Lavish Weddingची खास झलक

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 16:59 PM IST

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये ‘बच्चन’ यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर माध्यमांच्या नजरा खिळलेल्या असतात. अलीकडेच म्हणजे 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर रोजी बच्चन कुटुंब त्यांच्या नात्यातील एका लग्नात बिझी होते. या लग्नसोहळ्याचे खास फोटोज समोर आले आहेत. अमिताभ बच्चन त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या असे हे संपूर्ण कुटुंब यावेळी फोटोत एकत्र पाहायला मिळाले.

यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकींनी गुलाबी रंगाचे ड्रेस घातले होते. तर बिग बी आणि ज्युनिअर बी म्हणजेच अभिषेकने शेरवानी घातल्या होत्या. जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा रॉयल अंदाजात होत्या. दोघींनी अबु जानी - संदीप खोसलाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करताना लिहिले, की 'Family and a wedding .. they bring so many of us together for one cause to welcome the bride into the family .. 🙏🙏'.
या लग्नसोहळ्याचे खास Inside Photos बघा पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended