आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh, Dharmendra, Hema And Jaya At 'Dreamgirl' Music Launch

40 वर्षांनंतर एका फ्रेममध्ये दिसली 'शोले' टीम, जया म्हणाल्या, 'बिग बी 42 वर्षांपासून नाचवताय'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेमा मालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन - Divya Marathi
हेमा मालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन
मुंबई: धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रमेश सिप्पी यांनी सोमवारी (15 फेब्रुवारी) हेमा मालिनी यांचा 'ड्रिम गर्ल' अल्बम लाँच केला. बिग बींनी यावेळी सांगितले, की 'शोले'ची टीम तब्बल 40 वर्षांनंतर एकत्र आली आहे. मात्र धर्मेंद्र आणि हेमा, बिग बींच्या घराजवळच राहतात, तरीदेखील हे चौघे कधीच एकत्र भेटू शकले नाहीत.
42 वर्षांपासून गाताय बिग बी, नाचताय जया...
इव्हेंटदरम्यान हेमा मालिनी यांनी बिग बींना चार लाइन गाण्यास सांगितल्या. यावर ते म्हणाले, की लग्नाला 42 वर्षे झालीत आणि इतक्या वर्षांपासून मी गातच आहे. यावर जया म्हणाल्या, 42 वर्षांपासून अमिताभ गाताय आणि मी नाचतेय.
बिग बींनी शेअर केला फोटो...
इव्हेंटचे काही फोटो अमिताभ यांनी आपल्या फेसबुक शेअर करून लिहिले, '15th Feb 1969 ko Industry mein pehli film mili 'Saat Hindustani'... 47 saal ho gaye Film Industry mein aaj !! 26 saal ho gaye aaj 'Agneepath' ko .. aur 40 saal baad 'Sholay' ke 4 kalakaar ek hi frame mein mile .. aaj Hema ji ke function mein !!'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटशी निगडीत फोटो...