आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma And Virat Kohli Get GOOFY At Airport

मीडियाला बघून विराटने लपवला चेहरा, हसताना दिसली अनुष्का, जाणून घ्या कुठे चालले लव्ह बर्ड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा - Divya Marathi
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

एन्टरटेन्मेंट डेस्कः सेलिब्रिटी कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकत्र वेळ घालवण्याची एकही संधी हातून दवडू देत नाहीत. अलीकडेच या दोघांना गोवा एअरपोर्टवर एकत्र बघितले गेले. येथे अनुष्का मीडियाला बघून हसताना दिसली. मात्र विराट कोहली लगेज बॅगने आपल्या चेहरा लपवताना दिसला. असे तो एक गंमत म्हणून करताना दिसला. एअरपोर्टवर उपस्थित लोकांना विराटची ही करामत बघून हसू कोसळले. अनुष्कासुद्धा हे बघून खूप हसली.
इतर सेलेब्सही दिसले
विराट आणि अनुष्का यांच्यासह अनेक सेलेब्स रविवारी एअरपोर्टवर दिसले. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि त्यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांच्या नावांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली सेलेब्सची खास झलक...