आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स नाइटमध्ये बॉयफ्रेंडसोबत पोहोचली अनुष्का, मीडियाशी बोलताना चक्क लाजली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अधूनमधून तिचा बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसत असते. हे दोघेही मंगळवारी हातात हात घालून मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे आयोजित व्हाग ब्युटी अवॉर्ड्स सोहळ्यात पोहोचले. यावेळी दोघांनीही मीडियाला एकत्र पोजसुद्धा दिल्या.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट अनुष्कासोबत मीडियासमोर केवळ 40 सेकंदच थांबला, कारण अनुष्का खूप लाजत होती. विराट हॉटेलच्या आतमध्ये निघून जाताच अनुष्का मीडियाशी मनमोकळेपणाने बोलली.
एखाद्या इव्हेंटमध्ये जाण्यासाठी तयार होताना तुला बराच वेळ लागला तर विराट चिडतो का? असा प्रश्न अनुष्काला मीडियाने विचारला असता, ती म्हणाली, नाही. तो मुळीच चिडत नाही. रेड कार्पेटसाठी तयार होताना वेळ तर लागेलच ना.
या अवॉर्ड नाइटमध्ये अनुष्काला बेस्ट फेसचा अवॉर्ड मिळाला. तर विराट तिला चिअर अप करण्यासाठी येथे आला होता. यावेळी अनुष्काने सांगितले, की ती लवकरच करण जोहरच्या 'ए दिले मुश्किल' या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अवॉर्ड्स सेरेमनीत क्लिक झालेली अनुष्काची छायाचित्रे...