मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे रिलेशन आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मंगळवारी तर त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तबच झाले. घडले असे की, मंगळवारी मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे सहाव्या व्होग ब्युटी अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अनुष्का आणि तिचा बॉयफ्रेंड विराट आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. हे दोघेही हातात हात घालून सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले. फिक्कट पिवळ्या रंगाच्या हॉल्टर नेक गाऊनमध्ये विराटची लेडी लव्ह अनुष्का खूपच सुंदर दिसत होती.
अवॉर्ड नाइटमध्ये अनुष्का आणि विराट एकत्रच बसले. यावेळी हे दोघेही फन मूडमध्ये होते. त्यांची एकमेकांसोबतची बाँडिंग खूपच स्पेशल दिसली. आजवर विराटविषयी एक शब्दही न उच्चारणारी अनुष्का सोहळ्यात मात्र त्याला अलिंगन देताना दिसली. तिच्या गप्पांवर विराटसुद्धा मनमोकळेपणाने हसताना दिसला. या दोघांनीही यावेळी बराच चांगला वेळ एकत्र घालवला.
सोहळ्यात अनुष्का आणि विराटसह बरेच सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. अनुष्का राणी मुखर्जीची भेट घेतानासुद्धा दिसली. या सोहळ्यातील खास क्षणचित्रे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.
कसा होता व्होग ब्युटी अवॉर्ड्स सोहळ्यातील आतील नजरा बघा पुढील स्लाईड्समध्ये...