आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सुल्तान\' सलमानचा ईदच्या दिवशी दिसला हटके अंदाज, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईदनिमित्त सलमानच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. - Divya Marathi
ईदनिमित्त सलमानच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती.
मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमाने धमाकेदार सुरुवात केली आहे. सिनेमा सुपरहिट होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. नुकतीच ईदनिमित्त सलमान खानच्या घरी (गॅलक्सी अपार्टमेंट) पार्टी ठेवण्यात आली होती. रितेश-जेनेलिया, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलीन फर्नांडिससह अनेक स्टार्स यात सामील झाले होते.
ईदनिमित्त सलमानने ग्रीन कलरचा टी-शर्ट परिधा केलेला होता. त्यावर ब्लॅक टोपी घातलेली होती. सलमानचा असा वेगळा अंदाज खूप दिवसांनंतर पाहायला मिळाला. गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर त्याच्या चाहत्यांनी एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. सलमानने वडील सलीम खानसोबत गॅलरीत येऊन चाहत्यांना अभिवादन केले.
सेलिब्रेशनचा एक फोटो अर्पिता खानने इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये खान कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य दिसत आहेत. परंतु सर्वांच्या नजरा अरबाज खान आणि मलायका अरोरा खानकडे खिळल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघे विभक्त झाल्याचा बातम्या चांगल्याच चर्चेत होत्या. त्याचदरम्यान फॅमिली फोटो दोघे एकत्र दिसणे, वेगळाच इशारा करत होते. दोघांमध्ये सर्वकाही अलबेल झाल्याचे दिसत आहे.
या फॅमिली फोटोमध्ये सलमान दिसत नाहीये. त्याचे दोन्ही भाऊ अरबाज-सोहेल, वहिणी मलायका-सीमा, बहिणी अलविरा-अर्पिता, भावोजी अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मासोबत अरहान, अयान आणि आहिलने पोज देऊन फोटो परफेक्ट बनवला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खानच्या ईद पार्टीचे Photos...
बातम्या आणखी आहेत...