आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: 'मुबारकां'च्या अभिनेत्रींनी अर्जुनचे चक्क कान खेचून केले त्याला बर्थडे विश!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अर्जुन कपूरने आज त्याचा 32 वा वाढदिवस त्याच्या आगामी 'मुबारकां' या सिनेमाच्या स्टारकास्टसोबत साजरा केला. या सिनेमातील अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि अथिया शेट्टी यांनी हटके अंदाजात अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अर्जुनने केक कापल्यानंतर या दोन्ही अभिनेत्रींनी त्याचे कान खेचून त्याला बर्थडे विश केले. तर वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजे 25 जून रोजी अर्जुनने आपल्या घरी एक छोटी पार्टी ठेवली होती. या पार्टीत त्याचे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सहभागी झाले होते. रणबीर कपूर, आदित्य कपूर, संजय कपूर, हर्षवर्धन कपूर, करण जोहर, रणवीर सिंह अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते.

 28 जुलै रोजी रिलीज होतोय 'मुबारकां'...
दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा 'मुबारकां' हा सिनेमा येत्या 28 जुलै रोजी रिलीज होतोय. या सिनेमात अर्जुन कपूर दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत इलियाना डिक्रूज आणि अथिया शेट्टी मेन लीडमध्ये आहेत. शिवाय अभिनेता अनिल कपूरचीसुद्धा या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...   
बातम्या आणखी आहेत...