आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Asin And Rahul Sharma\'sWedding Reception Inside Photos

असिन-राहुलच्या वेडिंग रिसेप्शनचे नवीन INSIDE PHOTOS, सेल्फी मूडमध्ये दिसले सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असिन-राहुल शर्माच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीतील नजारा - Divya Marathi
असिन-राहुल शर्माच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीतील नजारा

एन्टरटेन्मेंट डेस्क- 19 जानेवारीला दिल्लीत लग्नगाठीत अडकल्यानंतर अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर राहुल शर्माने शनिवारी (23 जानेवारी) मुंबईत एक ग्रॅण्ड पार्टी ठेवली होती. ही वेडिंग रिसेप्शन पार्टी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल फोन सीजन्समध्ये पार पडली. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस, रितेश-जेनेलिया देशमुख, दिग्दर्शक साजिद खान आणि निर्माती अश्विनी यार्डीसह अनेक सेलेब्स दोघांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
या पार्टीत राहुल शर्मा असिनच्या फ्रेंड्ससोबत सेल्फी घेताना दिसले. केवळ राहुलच नव्हे अश्विनी यार्डी, ऑथर श्रीधर पिल्लईसह अनेक सेलेब्ससुध्दा रिसेप्शनदरम्यान सेल्फी मूडमध्ये दिसले. सेलेब्सने आपआपल्या टि्वटर हँडलवर रिसेप्शनमध्ये क्लिक केलेले सेल्फी पोस्ट केले आहेत. शिवाय असिनने स्वतःदेखील या रिसेप्शन पार्टीतील इनसाइड फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कशी रंगली असिन आणि राहुलची वेडिंग रिसेप्शन पार्टी...