आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Asin Rahul Spotted At Akshay Kumar’S Residence

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉयफ्रेंडसोबत पोहोचली होती असिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉयफ्रेंड राहूल शर्मासोबत अभिनेत्री असिन थोट्टुमकल)
मुंबई- बुधवारी (8 सप्टेंबर) 48वा बर्थडे सेलिब्रेट करत असलेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा इंडस्ट्रीशी जुळलेल्या अनेकांनी शुभेच्छा दिल्या. अक्षयला शुभेच्छ देण्यासाठी अनेकजण त्याच्या घरीसुध्दा पोहोचले होते. यावेळी अक्षयच्या 'खिलाडी 786' सिनेमातील त्याची को-स्टार असिन थोट्टुमकलसुध्दा त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. विशेष म्हणजे, असिन एकटी नव्हती आली, तिच्यासोबत बॉयफ्रेंड आणि मायक्रोमॅक्सचा को-फाउंडर राहूल शर्मासुध्दा पोहोचला होता. यावेळी ही जोडी स्टाइलिश अंदाजात दिसली. राहूल सूटमध्ये दिसला कर असिन ब्लू-ब्लॅक टॉप आणि ब्लॅक स्कर्ट परिधान करून डोळ्यावर गॉगल लावलेला होता.
मागील महिन्यात असिनचा 'ऑल इज वेल' सिनेमा खास कमाल दाखवू शकला नाही. परंतु ती आपल्या लव्ह-लाइफमुळे खूप चर्चेत राहिली. लवकरच असिल आणि राहूल लग्न करणार आहेत. बातम्यांनुसार, असिनचे लग्न अक्षय कुमारने जुळवून आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आणि राहूल चांगले मित्र आहेत. अक्षयनेच असिन आणि राहूलची भेट घालून दिली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अक्षयच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलेल्या असिन आणि राहूलचे फोटो...