आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: शाहिद-मीराच्या रिसेप्शनमध्ये बी टाऊनच्या तारकांचा दिसला दिलखेचक अंदाज, तुम्हीही पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः डावीकडे (वर) - जेनेलिया डिसुजा-देशमुख, (खाली) - कंगना रनोट, उजवीकडे (वर) - प्रीती झिंटा, (खाली) - सोनम कपूर)
मुंबईः रविवारी मुंबईत बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन पार्टी पार पडली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मांदियाळीत ही पार्टी रंगली. या पार्टीत नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. बिग बींसह बी टाऊनमधील अनेक यंगस्टर मंडळी आपल्या या मित्राला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचली होती.
विशेष म्हणजे या पार्टीत लक्ष वेधून घेतले ते बॉलिवूड तारकांनी. कंगना रनोट, प्रीती झिंटा जेनेलिया डिसुजा, आलिया भट, श्रद्धा कपूर, दिया मिर्झासह अनेकजणी ग्लॅमरस अंदाजात या पार्टीत दाखल झाल्या. या अभिनेत्रींनी ट्रेडिशनल ड्रेसेसला पसंती दिली होती. काही जणी पारंपरिक साडीत तर काही जणी सलवार सूटमध्ये येथे पोहोचल्या. यावेळी फोटोग्राफर्सनी या अभिनेत्रींचा दिलखेचक अंदाज आपल्या कॅमे-यात कैद केला.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, बी टाऊनच्या तारकांचा दिलखेचक अंदाज...